By  
on  

या वेब सिरीजमध्ये झळकतेय अभिनेत्री अमृता सुभाष, या भूमिकेसाठी मानले चाहत्यांचे आभार

नेटफ्लिक्सने नुकतीच त्यांच्या आगामी 17 ओरिजीनल स्टोरीजची घोषणा केली आहे. यात फिल्म्स आणि सिरीजचा समावेश आहे. नुकतीच या फिल्म्स आणि सिरीजचे लुक्सही रिलीज करण्यात आले आहेत. 

अलंक्रिता श्रीवास्तवा आणि बोर्निला चॅटर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'बॉम्बे बेगम्स' सिरीजचाही यात समावेश आहे. अभिनेत्री पूजा भटसह यात अमृता सुभाष, प्लबिता बोरठाकुर, आध्या आनंद, शहाना गोस्वामी ही कास्ट झळकणार आहे. या सिरीजचा भाग झाल्याचा आनंद अभिनेत्री अमृता सुभाषलाही आहे.  याचविषयी अमृताने नुकतीच पोस्ट केली आहे. यात तिचा लुकही तिने पोस्ट केला आहे. पाच विविध महिला, एक अतुट बंधन असा या सिरीजचा विषय आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Five different women, one unbreakable bond. It's a tough life, but we begums are tougher @poojab1972 @shahanagoswami @plabita.manu @aadhya_anand @endemolshineind. Coming soon on @netflix_in am so grateful to universe for this project which gives me opportunity to portray another wonderful character completely different from what I have done in past. Thank you so much #alankritashrivastav,@bornila and @shrutimahajancasting for this exciting journey! तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांमुळे मला ही आगळी भूमिका मिळाली. मी तुम्हा सर्वांची आणि आयुष्याची ऋणी आहे

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash) on

 

अमृता सुभाष तिच्या या पोस्टमध्ये लिहीते की, "मी खूप ऋणी आहे की या प्रोजेक्टमधून मला आणखी एक वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. आत्तापर्यंत केलेल्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे. धन्यवाद अलंक्रिता श्रीवास्तवा, बोर्निला आणि श्रुती महाजन या रोमांचक प्रवासासाठी. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांमुळे मला ही आगळी भूमिका मिळाली. मी तुम्हा सर्वांची आणि आयुष्याची ऋणी आहे."

 

लवकरच ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive