'देवमाणूस' मधील खलनायक साकारताना किरण गायकवाडची सुरुवातीला अशी झाली होती अवस्था, नायक - खलनायक

By  
on  

रक्षकच कसे भक्षक बनतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवमाणूस मालिका. चांगुलपणाचा बुरखा पांघरून घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी 'देवमाणूस' ही मालिका अल्पावधितच लोकप्रिय ठरतेय. हटके कथानक आणि मर्डर मिस्ट्री असलेली ही मालिका एका संवेदनशील विषयांवर बेतली आहे. रुग्णांचे प्राण वाचवणारा डॉक्टरच कसे त्यांचे जीव घेतो हे यात दाखवण्यात आलं आहे. या मालिकेत बोगस डॉक्टरची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड या मालिकेच्या निमित्ताने प्रचंड चर्चेत आहे. किरणने त्याच्या व्यक्तिरेखेसंंदर्भात पीपिंगमून मराठीशी खास बातचीत केली आहे.

Recommended

Loading...
Share