पाहा Video : अनिकेत जोशी आणि विराज राजे यांनी सांगितलं बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सिझनचं वैशिष्ट्य

By  
on  

मराठी बिग बॉसचं नवं पर्व मोठ्या कालावधीनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाचं हे तिसरं पर्व आहे. तिसऱ्या सिझनमध्ये मराठीपण आणि संस्कृती मोठ्या प्रमाणात जपली जाणार असल्याचं बिग बॉस मराठीच्या टीमने सांगितल. नुकतच पिपींगमून मराठीने कलर्स मराठीचे बिझनेस हेड अनिकेत जोशी आणि प्रोग्रॅमिंग हेड विराज राजे यांच्याशी संवाद साधला. यावेळी यंदाचं बिग बॉस मराठीचं स्वरुप त्यांनी थोडक्यात सांगितलंय.

बिग बॉस मराठी कार्यक्रमाच्या निमित्ताने कायम टीम वर्कमुळे हा कार्यक्रम आणखी मनोरंजक ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं. भांडण वैगेर या कार्यक्रमाचा भाग आहे पण या कार्यक्रमात यंदा मराठीपण ठळक पद्धतिने पाहायला मिळणार असल्याचं अनिकेत जोशी म्हटले. या कार्यक्रमाद्वारे मराठीपण जपलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Recommended

Loading...
Share