Video : 'वाय' सिनेमा का पाहावा याबद्दल सांगतेय, अभिनेत्री प्राजक्ता माळी

By  
on  

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या प्रचंड चर्चेत असलेला आणि मुक्ता बर्वे ची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट म्हणजेच 'वाय’! कन्ट्रोल -एन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांनी केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर झळकला असून यात हायपर लिंक थरार अनुभवायला मिळत आहे. ही संकल्पना मराठीत पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. येत्या २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या 'वाय' या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे, जी सत्य घटनांवर आधारित आहे. 

'वाय’ सिनेमात अभिनेत्री प्राजक्ता माळीची एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे, त्यानिमित्ताने तिने पिपींगमून मराठीसोबत केलेली ही खास बातचित 

Recommended

Loading...
Share