By  
on  

पडद्यावर जिजाऊ साकारायाला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट: मृणाल कुलकर्णी

स्वराज्यातील ‘सर्जिकल स्ट्राईकचा थरार दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर रसिकांसमोर घेऊन येणार आहे. पुरेशा सैन्यबळाअभावीही गनिमांची दाणादाण उडवणारी युद्धनिती म्हणून गनिमाकाव्याकडे पाहिलं जातं. याच तंत्राचा वापर करून शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला नमवलं होतं. शिवाजी महाराजांच्या अनेक यशस्वी मोहिमांच्या मागे प्रेरणा असायची ती आऊसाहेब जिजाऊंची.

 

 

फत्तेशिकस्तमध्ये जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी दिसत आहेत. यानिमित्तने त्यांनी अलीकडेच पीपिंगमूनशी बातचीत केली. ही भूमिका साकारण्याबाबत मृणाल म्हणतात, ‘जिजाऊंची व्यक्तिरेखाच अशी आहे की ती कितीही वेळा केली तरी दरवेळी त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळतं. इतिहास हा माझा आवडता विषय आहे. याशिवाय माझे आजोबा गो. नी, दांडेकर हे इतिहास संशोधकही होते. त्यांनी शिवकाळावर खुप लेखनही केलं होतं.

 

 

मला वाटतं माझ्या कलेच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा या स्त्रीच्या असामान्यत्वाला स्पर्श करायला मला मिळतो हे माझं खुप मोठं भाग्य आहे.’ ‘फर्जंद मध्ये शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील छोटसं पान अनुभवायला मिळालं होतं. पण फत्तेशिकस्तमध्ये त्यांची युद्धनिती रसिकांना अनुभवता येईल.’

Recommended

PeepingMoon Exclusive