By  
on  

संघर्षाच्या काळात अभिनेता गौरव घाटणेकरला नसीरुद्दीन शाहांच्या या शब्दांनी मिळाली प्रेरणा

अभिनेता गौरव घाटणेकर हा मराठी इंडस्ट्रीमध्ये मोजक्या सिनेमांमधुन स्वतःच्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता. 'तुजविण सख्या रे' मालिकेमधुन गौरव घाटणेकर हे नाव घराघरात पोहोचलं. गौरव घाटणेकरने पिपिंगमून मराठीसह बातचीत करताना त्याचा संघर्षाचा काळ उलगडला. 

गौरव म्हणाला," काय रे रास्कला नंतर माझे चार सिनेमे काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. आणि त्याकाळी मी लोकांसमोर यावं यासाठी सतत प्रयत्नशील होतो. परंतु साईन केलेले चारही सिनेमे येऊ शकले नाहीत. त्याकाळी मला खुप वाईट वाटलं."

 

गौरव पुढे म्हणाला," या काळात माझे गुरु नसीरुद्दीन शाहा मला भेटले. त्यावेळेस मी या काळातुन मुव्ह ऑन होऊन चांगल्या संधीची वाट पाहत होतो. तेव्हा नसीरसाब म्हणाले, एक कलाकार एका चांगल्या सीनची आणि चांगल्या संधीची वाट पाहत असतो." 

गौरव घाटणेकरला या वाक्यांनी प्रेरणा मिळाली. सध्या गौरव स्वतःची पत्नी आणि अभिनेत्री श्रृती मराठेसह एक प्राॅडक्शन कंपनी सांभाळत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive