By  
on  

बिग बॉस मराठी 3: अबब! महेश मांजरेकर एका एपिसोडसाठी घेतात इतकं मानधन

बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन खुप चर्चेत आहे. घरातल्या 15 सेलिब्रिटींनी नुसता धुमाकूळ घातला आहे. अनेक वाद-विवाद आणि टास्कचा खेळ घरात रंगतोय, ह्यात कोणीतरी बाजी मारतोय तर कोणालातरी हार पत्करावी लागतेय. हे एन्टरटेन्मेन्ट अनलॉक झालेलं चाहत्यांच्या खुप पसंतीस पडतंय. यासोबतचं आणखी एका गोष्टीसाठी आठवडाभर वाट पाहिली जाते ती म्हणजे बिग बॉसची चावडी. ही चावडी रंगवतात सर्वांचे लाडके निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर.  या शोचे सुत्रसंचालक अभिनेते महेश मांजरेकर आहेत.  यंदाच्या सीझनमध्ये एका नव्या लूकमध्ये महेश प्रेक्षकांसमोर आले आहेत. तर प्रत्येक एपिसोडसाठी महेश किती मानधन घेत असतील? हे जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.

बिग बॉसचं सूत्रसंचालन करण्याची महेश मांजरेकर यांची पध्दत तमाम प्रेक्षकांना खुप आवडते. हा शो आणि महेश मांजरेकर हे समिकरणच झालं आहे. त्यांच्याशिवाय या शोला गोडी नाही. त्यांच्या सूत्रसंचलनाने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढते तर स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली जाते. रिपोर्टनुसार, महेश एका एपिसोडसाठी २५ लाख रुपये घेतात. आठवड्यात २ एपिसोडचे सुत्रसंचालन महेश करतात. याचाच अर्थ ते एका आठवड्यासाठी ५० लाख रूपये मानधन घेतात.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive