बिग बॉस मराठी 3 Day 28 : विशाल विकासला म्हणाला, "मी डेव्हिलच आहे"

By  
on  

: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू आहे एक आगळवेगळं साप्ताहिक कार्य. अद्भुत नगरावर ताबा मिळविण्यासाठी राक्षस आणि देवदूतांमध्ये युध्द सुरू झालं. हे दोघेही स्वत:च्या मूळ स्वभावाशी एकनिष्ठ राहून हे युध्द लढणार असे जरी काल बिग बॉस यांनी जाहीर केले असले तरीसुध्दा हा प्रश्न मनात येतो सदस्य त्यांच्या मूळ स्वभावाशी एकनिष्ठ राहू शकतील ? टास्क जिंकण्यासाठी प्रत्येक सदस्य मनापासून प्रयत्न करतात पण कधी कधी ते काय करत आहेत याचं त्यांना भान रहात नाही. असंच काहीसं कालच्या भागामध्ये देखील घडले आणि जे सुध्दा घडणार असं दिसून येत आहे.
 
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून बिग बॉस मराठीच्या घरातील जय – विरूची जोडी आता कुठेतरी तुटणार असे वाटतं आहे. नॉमिनेशन टास्कपासून या वादाला सुरुवात झाली आणि हा वाद आज विकोपाला जाणार आहे. टास्कमुळे अजून काय काय घडणार ? किती नाती दुरावली जाणार? कोणाकोणाचे खरं रूपं समोर येणार ? हे अनेक प्रश्न कालचा प्रोमो बघून आपल्या मनात येऊ शकतात.

टास्कमध्ये आता टीम B डेव्हिल असणार आहे. यामध्ये आता विशाल आणि विकासच्या संयमाची कसोटी लागणार आहे. विशाल विकासला टास्क सुरू असताना म्हणाला सगळ्याचा हिशोब घेतला जाईल. विकासच्या रागाचा विशालला सामोरा करावा लागणार आहे... विकास चिडून विशालला म्हणाला खेळ खेळता येत नाही तुला हेच करणार तू... विशाल त्यावर म्हणाला मला खरोखर डेव्हिलच्या रूपात यायला नको लावूस. विकास म्हणाला “तू डेव्हिलचं आहेस, यायची गरज नाहीये... विशाल म्हणाला मी डेव्हिलचं आहे...
 
बघूया आता हा वाद अजून कुठवर जाणार ? विशाल आणि विकासची मैत्री अखेर तुटणार ? विकास संयम अखेर तुटला...तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
 

Recommended

Loading...
Share