बिग बॉस मराठी 3 Day 49: विशाल-विकास पुन्हा येणार हमरी-तुमरीवर

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या कार्यात उत्कर्ष आणि जय विजयी ठरले. उत्कर्ष या आठवड्यात कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी पात्र नसल्याने त्याने मीराला उमेदवारी दिली. आता कॅप्टन्सी टास्क मीरा आणि जयमध्ये पार पडणार असून लवकरच कळेल कोण असेल घराचा नवा कॅप्टन.

 

तर विशाल आणि उत्कर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास असमर्थ थरल्याने ते दोघे शिक्षेस पात्र ठरले. आज पार पडणार्‍या कॅप्टन्सी कार्यात मोठा राडा होणार असे दिसून येते आहे. हा राडा घरातील जय विरू म्हणजेच विशाल आणि विकास मदये होणार आहे. दोघांमध्ये मारामारी आणि धक्काबुक्की झाल्याचे नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसून आले.

 

 टास्कमध्ये विकास विशालला बोलताना दिसणार आहे, स्वत:ची वेळ आली तेव्हा हे करतो आहेस काल अका नाही केलं मग ? जय आणि उत्कर्ष होता म्हणून घाबरलास ? विशालचा विकासला प्रश्न तुझ्यात हिंमत आहे का ? तू एक नंबरचा फट्टू आहेस...विकास विशालला म्हणाला मी डोक्याने खेळतो... तू नावं घेतोस ना माउलींच सोडून दे आजपासून... कारण खोटारडा आहेस तू...

Recommended

Loading...
Share