बिग बॉस मराठी 3: उत्कर्षने सांगितला तो अनुभव, ती मृतदेहाला म्हणाली, 'चला उठा आता'

By  
on  

बिग बॉस मराठीचा यंदाचा तिसरा सीझन बराच चर्चेत आहे. वाद-विवाद, कुरघोड्या आणि एकापेक्षा एक वरचढ स्पर्धक यांमुळे ही स्पर्धा आता अटी-तटीची झाली आहे. घरातलं नॉमिनेशन , कॅप्टन्सी टास्क यांत जरी स्पर्धक एकमेकांसमोर उभे ठाकत असले तरी फावल्या वेळेत आपल्या आयुष्यातील हद्यस्पर्शी घटनांची देवाण-घेवाण करतानासुध्दा अनेकवेळा दिसतात. 

टीम ए चा लीडर डॉक्टर -गायक उत्कर्ष शिंदे हा मास्टरमाईंड म्हणून प्रसिध्द आहे. तो खुप छान गेम खेळतो म्हणून त्याचं प्रचंड कौतुक होतं. परंतु पेशाने डॉक्टर असलेल्या उत्कर्षे नुकतंच  दवाखान्यातील एक अनुभव मीरा जगन्नाथसोबत शेअर केला. तो अनुभव ऐकताना मीराच्या अंगावरही काटा आला.

उत्कर्ष सांगत होता, मी इंटर्नशीपला होतो, डॉक्टरकीची प्रॅक्टीस सुरु होती. त्यावेळेस माझी पुरुषांच्या वॉर्डमध्ये ड्युटी होती. तेव्हा एक आजी आल्या. माझ्या पाया पडून रडायला लागल्या. मला म्हणाल्या, डॉक्टर माझ्या मुलाला वाचवा. मला कळेना काही आणि मुलगा दारू प्यायलेला यकृत खराब झालेलं, तरी तिची माया त्याच्यासाठी तसूभरही कमी झाली नव्हती. मी आतून हललो आणि वाटलं काय माणसाचं जीवन आहे. त्या आजीला अजूनही वाटत होतं की तिच्या मुलाने जगावं.'

उत्कर्ष पुढे सांगू लागला, त्या माणसाचं यकृत खराब झालं होतं. त्याचा मृत्यू झाला होता. केस झाली. गेट बंद होता. त्याच्या बायकोला हे कळताच ती आरडाओरड करु लागली. आम्ही तिथेच राउंड मारत होतो. मृतदेह तिथेच होता. तिला आत सोडलं ती चालत आली आणि मृतदेहाला म्हणाली, चला उठा...उठा उठा आपल्याला घरी जायचंय. तिच्या हातात छोटंसं बाळ होतं. ती म्हणाली, आताच तर आपल्याला बाळ झालंय. चार महिने झालेत. सर तिथे उभे होते आणि मी बघत होतो. मला वाटलं की माणसाच्या भावना कशा असतात. काय उठणार तो. उठा उठा म्हणत डॉक्टरला पकडलं तिने. माझा नवरा परत द्या मला म्हणाली. 

Recommended

Loading...
Share