बिग बॉस मराठी 3 Day 54 : सोनालीचा विकासला टोमणा

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे कॅप्टन्सी टास्क... पण घरामध्ये विकास, विशाल, सोनाली, मीनल आणि गायत्रीमध्ये त्यासंदर्भातच एक चर्चा सुरू आहे. घरामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे टास्क आणि त्यानंतर घरातील duties कोण करणार ? हा प्रश्न. विकास त्याचबद्दल यांच्याशी बोलताना दिसणार आहे.

विकासचे म्हणणे आहे, मी कदाचित एकमेव माणूस आहे ज्याने प्रत्येक department मध्ये काम केले आहे. गायत्री आणि मीनल म्हणाली आम्ही पण... विकासच्या विधानावर सोनाली म्हणाली, तेच की आता राहिलं आहे ते किचन. नाही प्रॉपर नीट केलेलं नाहीस ना, नुसतीस ढवळाढवळी केली आहे...जशी करतोस टास्कमध्ये. मीनल म्हणाली, बाथरूम सोडून सगळं केलं कारण,ते तू सोडलं नाहीस.जेव्हा तू नव्हतास तेव्हा केलं आहे. विकासचे म्हणणे आहे, मुद्दे मांडण्याची वेळ येईल तेव्हा मला हा पॉइंट बोलता येईल ना. सोनाली म्हणाली, मी आता किचन घेणार नाहीये. विशालचे म्हणणे आहे, मी कॅप्टन असलो तरी काम करणार आहे.  

बघूया कॅप्टन कोण होणार ? आणि कोणत्या सदस्याला कोणत्या duties मिळणार. तेव्हा बघत राहा राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 

 

Recommended

Loading...
Share