बिग बॉस मराठी 3 : विशाल निकमची 'सौंदर्या' आहे तरी कोण, सुरुय महाराष्ट्रभर चर्चा

By  
on  

अभिनेता विशाल निकम हा बिग बॉस मराठी 3 चा स्पर्धक घरात अनेक कारणांनी चर्चेत असतो. कधी वाद-विवादामुळे तर कधी धम्माल-मस्ती, प्लॅंनिग यामुळे. पण सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन हा आता अंतिम टप्प्यांवर येऊन पोहचला आहे.

गेले 72 दिवस आपल्या कुटुंबिंयापासून दूर असलेले हे टॉप 8 कंटेस्टंटसाठी हा आठवडा खुप खास होता. फॅमिली विक म्हणून तो साजरा झाला. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात सदस्यांचे कुटुंबिय त्यांना भेटायला घरात आले होते. यावेळी  विशालची आई आणि धाकटी बहिणसुध्दा त्याला भेटायला आले होते.

त्यावेळी आईने ‘असं रडत जाऊ नकोस’ असे विशालला म्हटले आणि कोणावर जास्त चिडू नकोस, एकटाच बसत जाऊ नकोस असेही सुचवले. तू खूप स्ट्रॉंग आहेस आणि खूप चांगला खेळ असा सल्ला त्यांनी विशालला दिलेला पाहायला मिळाला. विशाल त्याच्या वडिलांना देखील खूपच मिस करत होता त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे आणि ह्या क्षणी ते मला भेटायला यायला हवे होते असे तो आईला म्हणाला. वडिलांच्या आठवणीत त्याने आईला आणखी एकाला फोन कर असे म्हटले. तू तिला फोन कर, तिच्याशी बोल असं विशाल म्हणताच त्याच्या आईने ‘सौंदर्याचे’ नाव घेतले ती म्हणाली सौंदर्याचा फोन आला होता , बहिणही तेच म्हणाली. है ऐकून विशालचा चेहरा खुप खुलला . मात्र तिच्याबाबत अधिक खुलासा करण्यास त्याने आईला थांबवले. ‘तिच्याबद्दल सांगायला अजून वेळ आहे’. 

यापूर्वीसुध्दा बिग बॉसच्या घरात पहिल्या काही आठवड्यांमध्ये विशाल हा एकटाच सौंदर्याशी बोलताना पाहायला मिळाला आहे. त्यामुळेच विशालची ही सौंदर्या कशी आहे, कशी दिसते, कशी बोलते आणि ती विशालची गर्लफ्रेंडच आहे का हे जाणून घेण्याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागली आहे.  

Recommended

Loading...
Share