बिग बॉस मराठी 3 Day 55 : मीराच्या मते गायत्री आणि जयच्या मते विकास ट्रॉफीपासून लांब

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज येणार आहेत दोन खास पाहुणे सुशांत शेलार आणि माधव देवचके. या दोघांनी सदस्यांसोबत बरीच धम्माल मस्ती केली, गप्पा मारल्या आणि सदस्यांना टास्कदेखील दिले. ज्यामध्ये मीराच्या मते गायत्री आणि जयच्या मते विकास ट्रॉफीपासून लांब आहेत असं त्यांना वाटतं आहे. त्यांनी त्याची कारणे देखील सांगितली.


 
मीराचे म्हणणे आहे, मला आता या स्टेजला येऊन असं वाटतं आहे की, गायत्री मागे आहे. तिची सवय दुसर्‍यांना बोलताना नेहेमी मागे पाडणे आणि गेममध्ये जरी टीममध्ये असलो तरीही individual अशी ती मला दिसत नाही. माझं हे एकंच कारण आहे की गेममध्ये टीममध्ये खेळताना सुध्दा एकटी कुठेतरी तू दिसून ये आणि खेळ.

जयने विकासचे नाव घेतले. तो म्हणाला, ऑफकोर्स सगळे deserve करतात. मी हे नेहेमीच म्हणत आलो की १९- २० चा फरक आहे आता सगळ्या सदस्यांमध्ये. जो सदस्य ट्रॉफी पासून जरा लांब आहे तो आहे विकास. कारण, जे आपण म्हणतो स्पोर्ट्स मॅन स्पिरीट पाहिजे खेळाडूमध्ये ते कुठतेरी कमी आहे अजूनही असं मला वाटतं. 


 
तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 
_

 

Recommended

Loading...
Share