By  
on  

बिग बॉस मराठी 3: सख्या मैत्रिणी, पक्क्या वैरीणी! गायत्री आणि मीराचा घरात अतरंगी डान्स

बिग बॉस मराठी ३ च्या घरात सध्या सख्या मैत्रिणी या पक्क्या वैरीणी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या मैत्रिणी कोण हे तुम्हाला वेगळं सांगण्याची नक्कीच गरज नाही. या मैत्रिणी आहेत, गायत्री आणि मीरा. एकेकाळी एकमेकींना बिलगून असणा-या या दौन मैत्रिणी आता एकमेकींची तोंडंसुध्दा पाहत नाहीएत. 

बिग बॉसच्या चावडीवर  गायत्री आणि मीराकडे एका चाहतीने अतरंगी मागणी केली आहे. या प्रोमोत पुण्यातील एक मुलगी गायत्री आणि मीराकडे अतरंगी मागणी करताना दिसत आहे. गायत्री आणि मीराने ‘मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा’ या गाण्यावर डान्स करावा, अशी मागणी तिने केली आहे. यानंतर महेश मांजरेकर मंचावरुन यातील नाग कोण आणि सपेरा कोण असा प्रश्न विचारत हसताना दिसतात.

 

दोघीजणी नागाप्रमाणे फणा काढत नाचताना दिसत आहे. कलर्स मराठीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive