By  
on  

बिग बॉस मराठी 3 : या कारणासाठी उघडले जाणार बिग बॉस मराठीच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार

बिग बॉस मराठी 3 च्या घरात नुकतीच काही सदस्यांची एन्ट्री झाली आहे. हे सदस्य यंदाच्या सिझनमधील घराबाहेर पडलेले स्पर्धक आहेत. यात तृप्ती देसाई, स्नेहा वाघ आणि आदिश वैद्य यांची पुन्हा एकदा बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री झाली आहे.

हे स्पर्धक घरात आल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत. कारण हे सदस्य घरात येताच नॉमिनेशन कार्यही पार पाडण्यात आले. यावेळी या नॉमिनेशन कार्यात घरात आलेले हे सदस्यही सहभाग घेतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

या नॉमिनेशन कार्यात प्रत्येक स्पर्धकाचा फोटो असलेली बाहुली असणार आहे. त्या बाहुलीला मुख्या प्रवेशद्वाराबाहेर टाकण्यात येईल. तेव्हा कोणता स्पर्धक या कार्यात नॉमिनेट होईल हे पाहणं औत्सुक्याचं असेल. 

तृप्ती देसाई, स्नेहा वाघ आणि आदिश वैद्य घरात आल्यानंतर आता घरातलं वातावरण कसं असेल हे आगामी भागात पाहायला मिळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive