बिग बॉस मराठी 3 : तिकीट टू फिनाले मिळवून विशाल निकम ठरला पहिला फायनलिस्ट

By  
on  

बिग बॉस मराठी ३ ची स्पर्धा आता अटीतटीची झाली आहे. सात स्पर्धकांपैकी फक्त ५ स्पर्धकच फिनालेपर्यंत पोहचणार आहेत. त्यामुळे कोण कोण या रेसमध्ये आहे हे पाहणं फारच रंजक झालं आहे. त्यातच बिग बॉसच्या घरात अनेक अनपेक्षित झटके सदस्यांना मिळतात. तसाच एक झटका नुकताच मिळाला. मीनल Ticket To Finale च्या टास्कमधून बाहेर पडली. मग  तीन दावेदार उत्कर्ष, मीरा आणि विशाल यांच्या Ticket To Finale चा टास्क रंगला. यात संयमाची कसोटी होती. 

अमेय वाघ, वैदेही परशुरामी आणि ललित प्रभाकर या झोंबिवली या सिनेमाच्या कलाकारांनी उत्कर्ष, मीरा आणि विशाल या स्पर्धकांमधून विजेत्याचं नाव घोषित करताच टीम बी ने एकच जल्लोष केला. कारणसुध्दा तसंच कारण Ticket To Finale वर विजय प्राप्त करत विशाल निकम बिग बॉस मराठी ३चा पहिला फायनलिस्ट ठरला. 

Recommended

Loading...
Share