By  
on  

बिग बॉस मराठी 3 : सोनाली पाटील घराबाहेर, उरले टॉप 6 स्पर्धक

‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय शो आता त्याच्या उत्तरार्धाकडे वळला आहे. टॉप 7 स्पर्धकांपैकी एका स्पर्धकाला घराबाहेर जावं लागलं आणि आता टॉप 6 स्पर्धक उरले आहेत. कालच्या चावडीनंतर अभिनेत्री सोनाली पाटीलने घरातून एक्झिट घेतली.  सध्या बिग बॉसमध्ये विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे आणि सोनाली पाटील हे सात स्पर्धक पाहायला मिळत होते. पण सोनालीला घराबाहेर जावं लागलं. 

सोनालीच्या निरोपामुळे मीनल शाह, विकास पाटील, विशाल निकम या तिच्या बी ग्रुपच्या मेंबर्सना अश्रू अनावर झाले. तिने हसत हसत घराचा निरोप घेतला. या घरात एक वेगळीच एनर्जी मिळत असल्याचं सोनालीने निरोपाच्या वेली भावूक होत महेश सरांना सांगितलं. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive