बिग बॉस मराठी 3 ची स्पर्धक मिनल शहासाठी रोडीज् फेम प्रिन्स नरुल्लाचा खास मेसेज

By  
on  

बिगबॉस मराठी ३ च्या घरातली दबंग गर्ल मिनल शहाने पाहता पाहता संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मोहात पाडले आहे. नाममात्र 'शहा' असलेल्या मुंबईच्या या मराठमोळ्या मुलीने टास्कमध्ये उतमोत्तम कामगिरी करत, बिगबॉसच्या घरातील गर्ल पॉवर जगाला दाखवून दिली. तिच्या ह्या दबंगगिरीची दखल संपूर्ण महाराष्ट्र तर घेत आहेच, पण आता हिंदी रोडिज स्टार प्रिन्स नेरूला देखील मीनलला सपोर्ट करत असल्याचे दिसून आले आहे. नर्प्रीन्सने मीनला 'जितके आना' असं ट्वीट करत चीअर अप केले असून, त्याच्या ह्या ट्वीटमुळे रोडिज गॅंग देखील मीनलच्या सपोर्टला आहे,हे सिद्ध झालंय. 

मिनलला खरी ओळख मिळाली ती लोकप्रिय कार्यक्रम असलेल्या 'रोडिज'च्या २०१७ मध्ये झालेल्या स्पेशल रायझिंग स्टार कार्यक्रमामुळे. त्यात ती सर्वात लोकप्रिय स्पर्धक म्हणून ओळखली गेली होती. अर्थात सेमी फायनलही ती विजयी होऊ शकली नाही. मात्र, गँग ऑफ लिडर प्रिन्स नरुलाची माजी सदस्य असलेल्या मीनलला बिगबॉस मराठी ३ ची ट्रॉफी मिळवून देण्यासाठी प्रिन्स सोशल मीडियाच्या माध्यमातून सहाय्य करत आहे.

 

Recommended

Loading...
Share