बिग बॉस मराठी 3 : टॉप 5 स्पर्धकांच्या शानदार परफॉर्मन्सनी सजणार ग्रॅण्ड फिनाले

By  
on  

गेले तीन महिने बिग बॉस मराठी ३ या छोट्या पडद्यावरच्या सर्वात लोकप्रिय शोने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. सर्वच स्पर्धकांनी एकापेक्षा एक खेळी करत आपलं स्थान निर्माण केलं. तब्बल 100 दिवसांच्या खडतर अशा प्रवासात टास्क, एलिमिनेशन, कॅप्टन्सी, कुरघोड्या, आरोप आणि वाद-विवादानंतर अखेर बिग बॉस मराठीच्या या सीझनला टॉप 5 स्पर्धक मिळाले. उत्कर्ष, जय , विकास, विशाल आणि मीनल हे स्पर्धक टॉप 5 मध्ये पोहचले आहेत. पण यांच्यातून एकच स्पर्धक विजेतेपदावर आपलं नाव करणार आहे. तेव्हा बिग बॉस मराठी सीझन 3 च्या ग्रॅण्ड फिनालेकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत. प्रत्येकजण आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकविण्यासाठी वोट्सचा वर्षाव करतायत. 

 

 

बिग बॉस मराठी सीझन 3चा ग्रॅण्ड फिनाले जबरदस्त शानदार होणार असल्याचं पाहायला मिळतंय. यासाठी आता अवघे काहीच तास बाकी आहेत. उत्कर्ष, जय , विकास, विशाल आणि मीनल हे आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सनी या शोची रंगत वाढवणार आहेत.  याची  झलक प्रोमोतून पाहायला मिळतेय. 

Recommended

Loading...
Share