बिग बॉस मराठी 3 : दोस्तांचा दमदार Performance पाहून वाढेल फिनालेची रंगत

By  
on  

आणि तो क्षण अखेर आला ! १०० दिवासांपूर्वी बिग बॉस मराठीचं नवं घर नवीन सदस्यांनी सजलं आणि महाराष्ट्रात एंटरटेनमेंट अनलॉक झाला. या प्रवासाची सुरूवात झाली १५ सदस्यांसोबत, त्यानंतर आदिश आणि नीथा शेट्टी यांची वाईल्ड कार्ड एंट्री झाली आणि आता बघता बघता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता उरले TOP ५ सदस्य म्हणजेच विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शहा. बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांनी कार्यक्रम सुरु होताच प्रेक्षकांची मने जिंकण्यास, त्यांच्या मनामध्ये एक विशेष स्थान मिळवण्यास सुरुवात केली

या १०० दिवसात हे सदस्य अनेक भाव भावनांना, अनेक चढउतारांना सामोरे गेले. कधी त्यांच्या हसण्याने तर कधी त्यांच्या भांडणाने तर कधी त्यांच्या रडण्याने तर कधी त्यांच्यातील प्रेमाने तर कधी त्यांच्या मैत्रीने या चार भिंतींना, बिग बॉसच्या या घराला घरपण आलं. पण, आता हा प्रवास येत्या रविवारी संपणार असला तरीदेखील हे नातं मात्र अधिक दृढ झालं.

घरातल्या ए आणि बी या दोन्ही टीममध्ये दोन जय-वीरुच्या जोड्या अवघ्या महाराष्ट्राने पाहिल्या आणि त्यांच्यातील जिव्हाळा आपुलकी व प्रेम पाहून सर्वांनाच भरुन आलं. ते म्हणजे विशाल-विकास आणि जय-उत्कर्ष.  एकीकडे मित्रासाठी डोक्यावरचे केस देणारा विकास तर आपल्यासाठी दिलेलं हे बलिदान पाहून गहिवरुन जाऊन स्वताचं सुध्दा टक्कल करुन घेणारा हळवा विकास. तर दुसरीकडे मित्राचं पोट भरत नाही म्हणून आपल्या ताटातली पोळी त्याला देणारा मित्र उत्कर्ष. अशा या दोन जोड्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. या जोड्या टॉप 5 मध्ये आपल्या मैत्रीचा सोहळा साजरा करणार आहेत. 

Recommended

Loading...
Share