BBM3 Grand finale : 20 लाख घेऊन उत्कर्ष शिंदे घेणार का टॉप 5 मधून माघार?

By  
on  

बिग बॉस मराठी सीझन ३ चा ग्रॅण्ड फिनालेसाठी आता अवघे काही तासच उरले आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा सीझन ३ ची ट्रॉफी कोण घेऊन जाणार याकडे डोळे लावून बसला आहे. अनेक ट्विस्टनी भरलेला हा सीझन ३ प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला. घरातल्या सर्वच स्पर्धकांनी धुमाकूळ घालत हा सीझन गाजवला. पण अंतिम टॉप 5 मध्ये पोहचलेले उत्कर्ष, जय , विकास, विशाल आणि मीनल यांपैकी कोण विजेतेपदावर नाव कोरणार याची उत्सुकता आहे. 

थेट आखलेला रंगतदार असा हा ग्रॅण्ड फिनाले नसून यात एक रंजक वळण येणार आहे. याचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोत बिग बॉस मराठीचे सर्वांचे लाडके सूत्रसंचालक महेश मांजरेकर आणि बिग बॉस सीझन 2 चा विजेता शिव ठाकरे पाहायला मिळतोय. यात महेश मांजरेकर पाचही स्पर्धकांना पाच लाखांची ऑफर देताना पाहायला मिळतायत. एकाने पाच लाख घ्यावे व स्पर्धेतून ताबडतोब बाहेर पडावे असे ते सांगताना दिसतायत. 

पण महेश मांजरेकरांची पाच लाखांची ऑफर कोणच स्विकारत नाही, म्हणूनच ते त्यांच्यासमोर 20 लाखांची ऑफर देतात. तेव्हाच उत्कर्ष आपला हात वर करतोय. 

 

आता उत्कर्ष शिवने दिलेली ही 20 लाखांची बॅग उचलून घराबाहेर पडणार की टॉप 5 मधलं स्थान सोडणार नाही हे पाहणं फिनालेमध्ये खुपच उत्कंठावर्धक ठरणार आहे.  

Recommended

Loading...
Share