BBM3 Grand finale : घराबाहेर गेलेल्या स्पर्धकांच्या परफॉर्म्सने लागणार फिनालेला चॉर चॉंद

By  
on  

गेले तीन महिने बिग बॉस मराठी ३ या छोट्या पडद्यावरच्या सर्वात लोकप्रिय शोने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. सर्वच स्पर्धकांनी एकापेक्षा एक खेळी करत आपलं स्थान निर्माण केलं. तब्बल 100 दिवसांच्या खडतर अशा प्रवासात टास्क, एलिमिनेशन, कॅप्टन्सी, कुरघोड्या, आरोप आणि वाद-विवादानंतर अखेर बिग बॉस मराठीच्या या सीझनला टॉप 5 स्पर्धक मिळाले.

उत्कर्ष, जय , विकास, विशाल आणि मीनल हे स्पर्धक टॉप 5 मध्ये पोहचले आहेत. पण यांच्यातून एकच स्पर्धक विजेतेपदावर आपलं नाव करणार आहे. तेव्हा बिग बॉस मराठी सीझन 3 च्या ग्रॅण्ड फिनालेकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत. प्रत्येकजण आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकविण्यासाठी वोट्सचा वर्षाव करतायत. 

 

 या स्पर्धेतून बाहेर गेलेल्या स्पर्धकांचा दमदार परफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आपल्या या मित्रांचा उत्साह वाढविण्यासाठी सर्वच एक्स कंटेस्टंट हजर आहेत आणि चिअर अप करतायत. 

Recommended

Loading...
Share