By  
on  

BBM3 Grand finale : बिग बॉसचे हे आहेत टॉप 3 स्पर्धक, विजेत्याकडे महाराष्ट्राचं लक्ष

अखेर बिग ब़ॉस मराठी 3 च्या ट्रॉफीचा खरा मालक आता लवकरच त्याला घरी घेऊन जाणार आहे. तो अभूतपूर्व क्षण जवळ येतोय. गेले तीन महिने बिग बॉस मराठी ३ या छोट्या पडद्यावरच्या सर्वात लोकप्रिय शोने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. सर्वच स्पर्धकांनी एकापेक्षा एक खेळी करत आपलं स्थान निर्माण केलं. तब्बल 100 दिवसांच्या खडतर अशा प्रवासात टास्क, एलिमिनेशन, कॅप्टन्सी, कुरघोड्या, आरोप आणि वाद-विवादानंतर अखेर बिग बॉस मराठीच्या या सीझनला टॉप 5 स्पर्धक मिळाले. उत्कर्ष, जय , विकास, विशाल आणि मीनल हे स्पर्धक टॉप 5 मध्ये पोहचले आहेत. पण यांच्यातून एकच स्पर्धक विजेतेपदावर आपलं नाव कोरणार आहे. तेव्हा बिग बॉस मराठी सीझन 3 च्या ग्रॅण्ड फिनालेकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत. प्रत्येकजण आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकविण्यासाठी वोट्सचा वर्षाव करतायत. 

सर्वप्रथम टॉप 5 मधून मीनल बाहेर पडली तर टॉप 4 मधून उत्कर्षला घराबाहेर जावं लागलं. आता  जय, विकास आणि विशाल हे अखेरचे टॉप 3 स्पर्धक घराला मिळाले. विजेतेपदावर कोणता स्पर्धक या तिघांपैकी नाव कोरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अवघ्या महाराष्ट्राचे  प्रेक्षक विजेत्याचं नाव ऐकण्यासाठी  आसुसले आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive