By  
on  

Bigg Boss Marathi 4 : गुरुनाथची माया फेम अभिनेत्री रुचिरा जाधवची घरात एन्ट्री

माझ्या नव-याची बायको मालिकेत गुरुनाथची माया साकारुन प्रेक्षकांच्या मनात घर करणारी बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री रुचिरा जाधव हिने बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतलीय.  बॉयफ्रेंड रोहित शिंदे सोबत धमाकेदार परफॉर्मन्स करुन तिने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

 

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या शोचं सुत्रसंचलन करताना दिसणार आहेत. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल थीमवर आधारित असणार आहे.  त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

बिग बॉस मराठीचं चौथं पर्व आजपासून म्हणजेच २ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ‘ऑल इज वेल’ थीमवर आधारित असलेल्या या पर्वाचा ग्रँड प्रीमियर कलर्स मराठीवर प्रसारित होत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive