Big Boss Marathi 4: “प्रत्येकाला individual खेळता येतं कोणी कोणाच्या आधारावर नाही आलं इथे” – यशश्री

By  
on  

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी आणला मोठा ट्विस्ट. कॅप्टन पदाचे चारही उमेदवारांनी कॅप्टन्सी आणि कुटुंबियांचे व्हिडीओ पाहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आता या चौघांपैकी कोणत्या दोन सदस्यांना हि संधी मिळेल हे आज कळेलच. आज त्रिशूल आणि समृद्धी अमृता धोंगडेशी चर्चा करताना दिसणार आहेत. तर दुसरीकडे योगेश, तेजस्विनी, यशश्री आणि प्रसाद देखील चर्चा करताना दिसणार आहेत. आता नक्की या चर्चा कशाबद्दल सुरु आहेत ? कोणाबद्दल सुरु आहेत ? हे आज कळणार आहे.

त्रिशुल अमृताला सांगताना दिसणार आहे, तुझ्या ग्रुपमध्ये मला तुझे मुद्दे खूप क्लिअर वाटतात. जे आहे ते तू स्पष्ट बोलतेस ऑन द फेस आहेस तू... अमृताचे म्हणणे आहे, माझे मुद्दे नेहेमीच वॅलीड असतात, मी उगाचच नाही बोलतं. आणि कोणीतरी बोलत आहे म्हणून माझा निर्णय मी बदलत नाही. माझ्या निर्णयावर मी ठाम असते त्यामुळे मला कोणीही कितीही MANIPULATE करू देत मला फरक पडत नाही." 

तर दुसरीकडे यशश्री तेजस्विनीला सांगताना दिसणार आहे, मी काय बोलून निघाले तेजा, मी individual खेळणार, मी आता या टास्क पुरता तुम्हांला सपोर्ट करते आहे, मला नाही फरक पडतं. पण इतकं म्हणणं आहे, आपल्याला खेळण्यासाठी ग्रुपची गरज लागणार आहे एका काळापर्यंत. प्रत्येकाला individual खेळता येतं कोणी कोणाच्या आधारावर नाही आलं इथे."

बघूया पुढे काय होईल ते आजच्या भागात. बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा.

Recommended

Loading...
Share