हिंदी बिग बॉसमध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेची चर्चा, उत्तर ऐकून सलमानंही झाला इम्प्रेस

By  
on  

बिग बॉस मराठी सीझन 2 चा विजेता शिव ठाकरे सध्या हिंदी बिग बॉस सीझन 16 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. मराठी बिग बॉसमध्ये जसा तो सर्वांशी मिळून मिसळून वागायचा तसाच तो आतासुध्दा वागतोय. हीच त्याची खासियत प्रेक्षकांची मनं जिंकतेंय. विकेंड का वारच्या मागच्या भागात आजारी असल्या कारणाने सलमान खान दिसला नव्हता, त्याच्याजागी करण जोहरने विकेंड का वार एपिसोड केला. आता पुन्हा सलमान परतला आहे, विकेंड का वार भागात सलमान पुन्हा त्याच्या स्टाईलने स्पर्धकांची शाळा घेताना दिसतोय. 

सलमान खान आणि बिग बॉस या ‘विकेंड का वार’मध्ये सदस्यांसह कानशीलात मारण्याचा खेळ खेळताना दिसला. या खेळात जेव्हा शालीन भानोत खुर्चीवर बसतो तेव्हा सलमान खान पहिला प्रश्न विचारतो की शालीन भानोत रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे आहे का? यावर शालीनला चपराक बसली. यानंतर पुढील प्रश्न असा होता की, शालीन सुंबुलचा वापर करतो का? या प्रश्नाच्या उत्तरात शिव सहमती दर्शवतो की होय शालीन ​​सुंबुलचा वापर करतो. त्यावरू शालीन आणि शिव यांच्यात वाद होतात.

शिवच्या बोलण्यावर शालीन भानोत आणि शिव ठाकरे यांच्यात वाद सुरू होतो. दरम्यान शालीन म्हणतो, “शिव तू माझ्याकडे ये, तुला काही अभिनय शिकायला हवा.” यावर शालीनला प्रत्युत्तर देताना शिव म्हणतो, “फक्त रिअॅलिटी शोसाठी तुला माझ्याकडून शिकण्याची गरज आहे कारण रिअॅलिटी शोमध्ये रिअल वागणं गरजेचं असतं.” शिवच्या या उत्तरावर शालीनचा चेहरा पाहण्यालायक होतो. तर सलमान खान मराठमोळ्या शिव ठाकरेच्या उत्तराने इम्प्रेस झालेला पाहायला मिळतोय.

 

दरम्यान, शिवचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. 

Recommended

Loading...
Share