Big Boss Marathi 4 - आता नक्की कोणती टीम जिंकणार ? कोणता सदस्य बाजी मारणार ?

By  
on  

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टीम रणनीती आखताना दिसणार आहेत. एकीकडे तेजस्विनी टीम तर दुसरीकडे अक्षयच्या टीममध्ये जोरदार चर्चा होताना होणार आहे. आता नक्की कोणती टीम जिंकणार ? कोणता सदस्य बाजी मारणार ? बघूया आजच्या भागामध्ये. 

तेजस्विनी म्हणाली, मला वाटतं किरण दादा, विकास पहिले त्यांनतर अमृता धोंगडे लगेच म्हणाली, आम्ही दुसरे जाणार आणि त्यावर समृध्दीचे म्हणाली नाही मला जायची ईच्छा आहे मी तुला आधीच बोले होते तेजु. तेजस्विनीसाठी हा निर्णय घेणं कठीण होऊन बसणार आहे कारण तिचं म्हणणं आहे तुम्ही सगळेच स्ट्रोंग आहात. त्यावर समृध्दी म्हणाली पण लास्ट टाईम मी काहीच परफॉर्म नाही केलं आहे त्यामुळे खरंच मला... त्यावर अमृता म्हणाली, पण तुला मिळणार आहे परफॉर्म करायला. आणि यावरून समृध्दी आणि अमृता मध्ये वादावादी सुरू झाली. समृध्दी म्हणाली, मी देखील तुला असं बोलूच शकते ना ? अमृता म्हणाली हो पण मला खेळायचे आहे. आता या दोघी अडून आहेत बघूया तेजस्विनीचा निर्णय काय असेल ? 

दुसरीकडे अक्षय आणि टीम चर्चा करताना दिसणार आहेत. अक्षय टीमला सांगणार आहे, आपल्याला जो वाटतो आहे एक त्याला टार्गेट करायचे आणि दुसरा असाच टाईमपास करायचा. जर चार असतील तर तीन जणांनी एकावर टार्गेट करायचं आणि एकाने एकावर ...साध्या पाण्याने आंघोळ घालून थंड करून टाकायचे गेल्या गेल्या आणि मग आपला कार्यक्रम सुरू करायचा. बघूया दोन्ही टीम रणनीती आखत आहेत... पण विजयी एकचं टीम होणार आहे.

बघूया अजून काय झालं घरात कोणत्या चर्चा रंगल्या आणि कोणामध्ये झाला वाद आजच्या भागात. बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा.

Recommended

Loading...
Share