शो मराठी पण सदस्यांची भाषा मात्र इंग्रजी, नक्की काय सुरु आहे वाचा सविस्तर

By  
on  

 ‘मराठी बिग बॉस’ या शो ने रसिकांच्या मनात खास जागा मिळवली आहे. यापुर्वी केवळ हिंदीत प्रसारित होणा-या या शोने मराठीत एंट्री केली आणि धमाल उडाली. आजवर केवळ स्क्रीनवर मेक अपमध्ये दिसत असलेले सेलिब्रिटी रिअल लाईफमध्ये कसे दिसतात, कसे वागतात याचे रसिकांना बिग बॉसच्या माध्यमातून दर्शन घडलं. मराठी प्रेक्षकाचा हक्काचा रिअ‍ॅलिटी शो म्हनून ‘बिग बॉस’ कडे पाहिलं जाऊ लागलं आहे. पण सध्याच्या पर्वात मात्र बिग बॉस मराठी ऐवजी हिंदी किंवा इंग्रजीत बघत आहोत कि काय अशी शंका येते. कारण निम्म्यापेक्षा जास्त सदस्य इंग्रजीत भांडतातच पण नेहमीचं संभाषणही अनेकदा हिंदीमधूनच होत असतं. बाहेरच्या जगात खरं तर मराठी कलाकाराचं लेबल लावून काम करणारे कलाकार साधं संभाषणदेखील मराठी ऐवजी हिंदी आणि इंग्रजीमधून करत असतात, किती हा कर्मदरिद्रीपणा !

 

मागच्या सीझनमध्ये देखील काही सदस्यांच्या अतिइंग्राजळलेल्या संभाषणावर ‘बिग बॉस’नी चांगलं खडसावलं होतं. निदान या सीझनमधील कलाकारांवर तरी अशी वेळ येऊ नये हीच सर्वसामान्य मराठी माणसाची इच्छा आहे.

Recommended

Loading...
Share