बिग बॉस मराठी 2: किशोरी शहाणे देत आहेत बिचुकले आणि दिगंबर नाईकला फिटनेसचे धडे

By  
on  

'बिग बॉस'च्‍या घरामध्‍ये प्रवेश केल्‍यापासून किशोरी शहाणे आपली जादू पसरवत आहे. ती तिच्‍या फिटनेसप्रती असलेल्‍या निष्‍ठेसह आपल्‍याला प्रभावित करण्‍यासाठी कोणतीच कसर सोडत नाही. ५१ वर्षीय अभिनेत्री दिगंबर नाईक व अभिजीत बिचुकलेला प्राणायाम शिकवताना दिसत आहे. 

दिगंबर व बिचुकले गार्डनमध्‍ये गप्‍पा मारत आहेत आणि तेवढ्यात त्‍यांना किशोरी तिची नियमित योगासने करताना दिसते. दिगंबर तिला हाक मारतो आणि म्‍हणतो, ''बाहेर सोडायचं ना ते..?'' किशोरी लगेचच त्‍याच्‍याजवळ बसून त्‍याला योगासनांची पद्धत व सूचना सांगण्‍याचा प्रयत्‍न करते आणि म्‍हणते, ''श्‍वास बाहेर सोडायचा असतो, करूया का?'' 

पहिल्‍यांदा दिगंबरला सराव करताना अस्‍वस्‍थ वाटते. तो किशोरीला त्‍याची पत्‍नी कशाप्रकारे योगा करते, पण त्‍याला त्‍याबाबत आवड नसल्‍याचे सांगतो. पण शेवटी तो किशोरीसाठी योगासन करण्‍याचे मान्‍य करतो. ती व दिगंबर योगासन करत असताना ती बिचुकलेला त्‍यांच्‍यासोबत सामील होण्‍यास सांगते आणि म्‍हणते, ''हे तुम्‍ही करू शकता, पाय दुखत असतील तरी.'' झोपाळ्यावर झोके घेत असलेला बिचुकले उठतो आणि तिच्‍या सूचनांचे पालन करतो. 

एकूणच या प्रसंगावरून 'बिग बॉस'च्या  घरामध्‍ये फिटनेस क्रांती तर नाही ना? किशोरी घरातील स्पर्धकांना फिटनेस साठी प्रोत्साहन देत असलेली दिसून येत आहे. आता स्पर्धकांमध्ये घरात राहण्यासाठी कशी चुरस रंगणार आहे, हे येत्या काही दिवसांमध्ये कळून येईल. बिग बॉसमधील अशाच गोष्टी प्रेक्षकांना voot ऍप वर पाहता येतील. 

Recommended

Loading...
Share