By  
on  

बिग बॉस मराठी 2 : घरातल्या सदस्यांचं भविष्य सांगत आहेत बिचुकले बाबा

बिग बॉस' घर हे अत्‍यंत अनपेक्षित घर आहे आणि स्‍पर्धक तेथे योग्‍य प्रदर्शन करण्‍याचा सर्वतोपरी प्रयत्‍न करत आहेत. आता या घरातील स्‍पर्धक एकमेकांच्‍या भविष्‍याचा अंदाज करण्‍यामध्‍ये व्‍यस्‍त आहेत. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये अभिजीत बिचुकले शिव ठाकरे व वैशाली म्‍हाडेसोबत बसला आहे, जेथे तो म्‍हणतो की तो हस्‍तरेखा वाचून भविष्‍य सांगू शकतो. हे ऐकून शिव उत्‍सुक होतो आणि बिचुकलेला त्‍याच्‍या हस्‍तरेखा वाचण्‍यासाठी सांगतो.

बिचुकले म्‍हणतो, ''तुला पैसा खूप आवडतो आणि पोरींचा पण खूप नाद आहे तुला, जे तू दाखवत नाहीस'' आणि पुढे विचारतो, ''तू पोलिस किंवा मिलिटरीमध्‍ये जायचा विचार केला होतास ना?'' शिव या अंदाजाला नकार देतो आणि म्‍हणतो, ''नाही, बॉडी बनली म्‍हणून तुम्‍ही कुठच्‍या कुठे जुळवू नका. थुकू नका!''

यामुळे तिघेही हसू लागतात. बिचुकले पुढे म्‍हणतो, ''डान्‍स, डायरेक्‍शनचं काम कर त्‍यात भविष्‍य आहे तुझं'' तसेच आणखी पुढे म्‍हणतो, ''कला क्षेत्रात आहे भविष्‍य तुझं''.

हस्‍तरेखा वाचण्‍याचे सत्र येथेच थांबत नाही. शिव वीणाकडे जातो. ती नेल कलरने तिचे सिपर रंगवण्‍यामध्‍ये व्‍यस्‍त होती. शिव तिला विचारतो, ''लहानपणी कधी डोक्‍यावर पडलेलीस का?'' आणि वीणा त्‍याला हो म्‍हणून प्रत्‍युत्‍तर देते!

शिव तिला आणखी चिडवत म्‍हणतो, ''तिथेच सगळा प्रोब्‍लेम झाला आहे. आणि तुला बिग बॉस हाऊसमध्‍ये कुठला क्‍यूट आणि हँडसम मुलगा भेटला आहे?'' तो स्‍वत:बद्दलच बोलत असतो, पण वीणा ते कळत नाही असे दाखवते आणि त्‍याच्‍याकडे दुर्लक्ष करते.

घरातील हे नवीन प्रेम त्रिकूट आहे की, हस्‍तरेखा वाचण्‍याचे बनावटी खूळ आहे? तुम्‍हीच ठरवा फक्‍त वूटवरील 'अनसीन अनदेखा'मध्‍ये!

Author

Recommended

PeepingMoon Exclusive