बिग बॉस मराठी 2: 'ड्रामा क्वीन' शिवानीने चक्क बिग बॉसलाच दिली धमकी!

By  
on  

'बिग बॉस मराठी'च्या घरात शिवानी सुर्वे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. शिवानीचे घरातील इतर सदस्यांसोबत थोडेफार मतभेद असलेले दिसून येत आहेत. परंतु आता शिवानीने थेट बिग बॉसशी बंड पुकारला आहे. 

शिवानीला बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शिवानीने बिग बॉस समोर वारंवार घराबाहेर पाठवण्याची विनंती केली. ही विनंती करताना शिवानीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. 

''जोवर बिग  बॉस मला कन्फेशन रूम मध्ये बोलवत नाही तोपर्यंत मी माईक वापरणार नाही आणि कोणत्याही टास्क मध्ये भाग घेणार नाही '' असा पवित्रा शिवनीने घेतला. त्यावेळी अभिजीत केळकर, बाप्पा जोशी, माधव देवचके आणि नेहा शितोळेने यांनी शिवानीला आटोकाट समजवायचा प्रयत्न केला. मग अखेर शिवानीचं मतपरिवर्तन होऊन ती माईक वापरायला तयार झाली. 

परंतु शिवानीचं रडणं काही थांबत नव्हतं. ''बिग बॉस कोणालाही जबरदस्ती घरात ठेवू शकत नाही. त्यांनी जर माझ्या म्हणण्याचा विचार केला नाही तर मी त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकते.'' अशा स्वरात शिवनीने थेट बिग बॉसलाच धारेवर धरले. 

अखेर मध्यरात्री दोन वाजता बिग बॉसने शिवानीला  कन्फेशन रूममध्ये बोलावलं. त्यावेळी शिवानीने बिग बॉसविरुद्ध कायदेशीर भाषा वापरल्यामुळे बिग बॉसने शिवानीला कायदेशीर प्रक्रिया लवकरच सुरु करू असे सांगितले. तेव्हा शिवनीने ''मी रागाच्या भरात मगाशी कायद्याची भाषा वापरली. माझ्या घरी सध्या आर्थिक अडचणी आहेत. मित्रांकडून पैसे उधार घेऊन मी बिग बॉसच्या घरात अली आहे. त्यामुळे कायदेशीर कारवाई मला परवडणार नाही. त्यामुळे माझ्या करीयरवर सुद्धा परिणाम होऊ शकतो.शकतो. त्यामुळे आपण संगनमताने हा प्रॉब्लेम सोडवू'',  अशी विनंती शिवानीने बिग बॉसला केली. यावर बिग बॉसनी कोणतंच उत्तर दिलं नाही. 

एकूणच शिवानीने यापूर्वी सुद्धा चोर-पोलीस टास्क दरम्यान तब्येतीचं कारण सांगून टास्क खेळण्यास नकार दिला. तसेच जेव्हा बिग बॉसने शिवानीला अडगळीच्या खोलीत जाण्याची शिक्षा सुनावली होती तेव्हाही सुरुवातीला शारीरिक कारणांमुळे शिवानीने अडगळीच्या खोलीमध्ये गेली नव्हती. टास्क दरम्यान शिवानी तब्येतीचं कारण पुढे करताना दिसत आहे आणि इतर वेळी मात्र शिवानी सदस्यांशी तावातावाने भांडत असते. 

बिग बॉसच्या घरातील ही 'ड्रामा क्वीन' या सर्व गोष्टी प्रेक्षकांचं आणि घरातील सदस्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी करत आहे की यामागे तिची काही स्ट्रॅटेजी आहे हे फक्त स्वतः शिवानीला ठाऊक असेल.

 

 

Recommended

Loading...
Share