By  
on  

बिग बॉस मराठी 2: घरातील सदस्य 'प्रेम रंगी रंगले'

'बिग बॉस मराठी 2' मधली चुरस दिवसेंदिवस वाढत आहे. नवनवीन टास्क, स्पर्धकांमधील भांडणं, वादावादी यामुळे 'बिग बॉस'च्या घरात सदस्यांमध्ये वेगळी रंगत पाहायला मिळत आहे. सध्या बिग बॉसमध्ये शाळा सुटली पाटी फुटली हा टास्क चालू आहे. 

या टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये अनेक गमतीजमती पाहायला मिळत आहेत. अशातच या टास्कमध्ये स्पर्धकांसाठी प्रेमाचा तास ठेवण्यात आला आहे. या टास्कमध्ये बाप्पा जोशी-सुरेखा पुणेकर, रुपाली भोसले-पराग कान्हेरे, शिव ठाकरे-वीणा जगताप अशा हटके जोड्या पडल्या आहेत. 

 

या जोड्यांनी आगळ्या वेगळ्या अंदाजात एकमेकांसाठी प्रेमभावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये पराग-रुपाली एकत्रित रोमँटिक गाण्यावर नाचत आहेत. तर शिवने या टास्कमध्ये गुडघ्यावर बसून वीणाला प्रपोज केलं आहे. 

या टास्कमध्ये खरी रंगात आणली ती सुरेखा पुणेकर आणि बाप्पा जोशी यांनी. बाप्पांनी सुरेखाताईंसाठी 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल' हे गाणं गायलं. तर सुरेखा ताईंनी 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' हे गाणं गाऊन बाप्पांसमोर फुगडी घातली. काही काळ एकमेकांमधले मतभेद विसरून सर्वांनी हा टास्क एन्जॉय केला. या टास्कमध्ये आणखी काय पाहायला मिळणार हे 'बिग बॉस'च्या आजच्या भागात पाहायला मिळेल. 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive