By  
on  

बिग बॉस मराठी 2: हस्तरेखांच्या विद्येनंतर घरात रंगत आहे संख्याशात्राची चर्चा

'बिग बॉस मराठी 2' च्या घरात नुकतंच हस्तरेखांची चर्चा रंगताना दिसून आली. या चर्चेनंतर आता बिग बॉसच्या घरात संख्याशास्त्राची चर्चा सदस्यांमध्ये रंगताना दिसून येत आहे. 

सुरेखा पुणेकर, नेहा शितोळे, किशोरी शहाणे, वैशाली माडे गप्पा मारत बसलेले असताना त्यांच्यात या लकी नंबर्सची चर्चा रंगताना दिसली. 

सुरेखाताईंनी या चर्चेची सुरुवात करताना त्या रुपालीबद्दल म्हणाल्या,''रुपाली २९ डिसेंबरची आहे. आकड्यात दोन संख्या असलेली लोकं खूप हुशार आणि श्रीमंत असतात.''

यापुढे नेहा म्हणाली,''माझा लकी नंबर ७ आहे. म्हणून जेव्हा महेश सरांनी विचारलं तेव्हा मला ७ नंबरवर माझी नावाची पाटी लावायची होती. परंतु ७ नंबर गेला होता. म्हणून मग मी १६ नंबरवर माझी पाटी लावली.''

किशोरी शहाणे याबद्दल म्हणाल्या,''माझ्या आयुष्यात ७ नंबर आपोआप येत राहतात. माझा घरचा नंबर b -२५,माझ्या ऑफिसचा नंबर ७, माझ्या फर्मचा नंबर ४३तसेच माझ्या बोर्ड परीक्षेचा नंबर सुद्धा ७ जोतं. हे सर्व ठरवून नाही तर आपोआप जुळत गेलं.''

घरातील सदस्यांचं संख्याशास्त्रावरचा विश्वास त्यांना टास्क जिंकायला कशी मदत करेल, हे पाहणं कुतूहलाचा विषय आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive