By  
on  

बिग बॉस मराठी 2: बिचुकले असं काय म्हणाले की किशोरीताईंचा पारा चढला

बिग बॉसच्या घरात काल दुसरं एलिमिनेशन पार पडलं. या एलिमिनेशन राऊंडमध्ये दिगंबर नाईक हा दुसरा स्पर्धक घराबाहेर पडला. 

आजपासून बिग बॉसचा नवा आठवडा सुरु होत असून पहिल्याच दिवशी बिचुकले आणि किशोरी शहाणे यांच्यात खटका उडालेला दिसून येत आहे. पहिल्या दिवशी सकाळी बिचुकले नेहमीप्रमाणे स्वतःच्या बेडवर आराम करत होते. तेव्हा बिचुकले आणि किशोरी यांच्यात भांडण झालं.

''मी जेवढा तुम्हाला रिस्पेक्ट देतो, तेवढा तुम्ही मला देत नाही. तुम्ही माझं नाव नॉमिनेशन मध्ये घ्यायचं नाही .'' असं बिचुकले किशोरीताईंना म्हणाले. त्यावर किशोरी,''माझ्या एकटीने काय होतंय. सर्वांनी केलं पाहिजे.'' असं म्हणाल्या. 

 

यावर बिचुकलेंनी व्ययक्तिक खेळाबाबत किशोरींना टोमणा मारला. त्याकडे दुर्लक्ष करून किशोरी जात असतानाच बिचुकले पुन्हा किशोरीताईंना म्हणाले,''तुम्ही डोकं शांत ठेवा आणि उगाच काड्या लावू नका'' यावर मात्र किशोरी बिचुकलेंवर भडकल्या. ''तुम्ही हे जे बोललात ते मला अजिबात आवडलं नाहीय. खोटे आरोप नाही करायचे'' असं किशोरी बिचुकलेंना रागात म्हणाल्या. 

त्यावर बिचुकलेंनी शब्द मागे घेतला. परंतु बिचुकलेंनी मारलेले हे टोमणे किशोरी लक्षात ठेवून त्यांना या आठवड्यात नॉमिनेट करतात का? हे बिग बॉसच्या पुढच्या भागांमध्ये कळून येईल. 

Recommended

PeepingMoon Exclusive