By  
on  

बिग बॉस मराठी 2: घरात आणि घराबाहेर वीणा जगतापला मिळत आहे सर्वाधिक पसंती

 

'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली विणा जगताप आता 'बिग बॉस मराठी 2' मधून आपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. घरातील सदस्यांबरोबरचा तिचा वावर असो वा टास्क दरम्यान तिने केलेली मस्ती असो, तिचे चाहते तिला सतत प्रोत्साहित करताना दिसून येतात.

तिचा मनमोकळा आणि स्पष्टवक्तेपणा लोकांना आवडत असून, 'बिग बॉस मराठी 2' मधील तिच्यासोबत घरात असलेल्या स्पर्धकांच्या तुलनेत 'वीणा' चे सोशल नेटवर्किंग वरील फॉलोअर्स कमालीचे वाढत असलेले आपल्याला पहायला मिळते आहे.

कारण, इन्स्टाग्रामवरील तिच्या खाजगी अकाउंटवर 151 k फॉलोअर्स  दिसू लागले आहेत. विशेष म्हणजे या आकड्यांच्या आसपास 'बिग बॉस मराठी 2'  चा एकही सदस्य आतापर्यंत पोहोचू शकला नाही. 

यावरून असं दिसून येतं बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेर वीणा जगताप लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेली दिसून येत आहे. वीणा यापुढे बिग बॉसच्या घरात कसा खेळ खेळणार हे पाहणं कुतूहलाचा विषय असणार आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive