By  
on  

बिग बॉस मराठी 2: वैशाली माडेला काम करायचंय या जगप्रसिद्ध संगीतकारासोबत

'बिग बॉस' घरातील स्‍पर्धक अनेक स्‍वप्‍नं पाहत असल्‍याचे आणि ती स्‍वप्‍नं पूर्ण होण्‍याची इच्‍छा बाळगून आहेत असे वाटते. बिग बॉस मधील एका निवांत क्षणी बाप्‍पा, अभिजीत केळकरसह वैशाली माडे गार्डनमध्‍ये बसलेले दिसत आहेत. अभिजीत वैशालीला तिच्‍या सर्वात मोठ्या स्‍वप्‍नाबाबत विचारत आहे.

सुरूवातीला वैशाली काहीशी शांत राहते, पण नंतर म्‍हणते, ''आता मला एकच ड्रीम आहे, मला एआर रेहमानबरोबर काम करायचयं.'' अभिजीत आणि घरातील इतर सदस्य तिला शुभेच्‍छा देत म्‍हणतात, ''तथास्‍तु, तथास्‍तु.''

वैशाली पुढे म्‍हणते, ''एआर रेहमानबरोबर गायचंय मला. त्यांच्यासोबत गायचंय आणि त्‍यांच्‍यासोबत रेकॉर्डिंगसुद्धा करायचंय.''

वैशाली मनोरंजन क्षेत्र किती अनपेक्षित आहे याबाबत सांगत म्‍हणते, ''हे इतकं अनप्रेडीक्‍टेबल फिल्‍ड आहे, कधीही काहीही होऊ शकतं. कधीही कॉल येऊ शकतो.  इथे ज्‍यादिवशी निघाले सकाळी, त्‍या सकाळी मला फोन आला अंकित तिवारीच्‍या ग्रुपमधनं की ह्या आठवड्यात काय शेड्यूल आहे तुझं?.''

ए.आर. रेहमानसोबत गाण्याचं वैशालीचं स्वप्न लवकरच पुर्ण होईल, अशी तिच्या चाहत्यांना आशा आहे. बिग बॉसच्या घरातील अशाच न पाहिलेल्या गोष्टी प्रेक्षकांना Voot ऍपवर पाहता येतील. 

Recommended

PeepingMoon Exclusive