By  
on  

बिग बॉस मराठी 2 : एवढं काय झालं की बिचुकले रुपालीवर भडकले?

'बिग बॉस मराठी 2' च्या घरात अनेक नाट्यमय प्रसंग प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. कुठे भांडणं, तर कुठे गटबाजी होताना दिसत आहे. अशातच बिग बॉसच्या घरात हीना पांचाळच्या रूपात पहिली वाईल्डकार्ड एन्ट्री  झाली आहे.

बिग बॉसच्या घरात नव्या आठवड्याला सुरुवात झाली असून वैशाली माडेला कॅप्टनपदाचा मान मिळाला आहे. आज बिग बॉसच्या घरात या आठवड्यातला 'शेरास सव्वाशेर' टास्क खेळला जाणार आहे. या टास्क दरम्यान बिचुकले आणि रुपालीमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळत आहे. 

टास्क दरम्यान रुपाली बिचूकलेंना ''तुम्ही स्ट्रॉंग नाही आहेत बिचुकले! चार महिन्यांची मुलगी आहे तुम्हाला, शप्पथ घ्या'' म्हणाली. हे ऐकताच बिचूकलेंचा पार चढला. ''माझ्या मुलींपर्यंत जायचं नाही'' असं त्यांनी मोठ्याने म्हणत समोर जो नंबरचा स्टॅन्ड ठेवला होता तो स्टॅन्ड त्यांनी आक्रमकरीत्या हातात धरला. 

बिचुकलेचं हे रौद्र रूप पाहताच नेहा आणि घरातल्या इतर सदस्यांनी त्यांना समजावयाचा प्रयत्न केला. परंतु बिचुकले मात्र रागाच्या भरात संबंध घरभर फिरून बिगबॉसशी मोठ्या आवाजात बोलत होते. 

या टास्कदरम्यान अभिजीत केळकर आणि किशोरीताईंमध्ये सुद्धा शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळाली. 

 

तर दुसऱ्या ठिकाणी पराग आपला ग्रुप सोडून दुसऱ्या ग्रुपसोबत खेळात असल्याने रुपालीला अश्रू अनावर झाले. तिने आपली ही वेदना किशोरीताई आणि परागसमोर मांडून डोळ्यातून अश्रू गाळले. 

एकूणच 'बिग बॉस'च्या घरात यापुढे अनेक रंजक प्रसंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive