By  
on  

बिग बॉस मराठी 2: बिचुकले आणि रुपालीत जुंपली, दोघांनी काढली एकमेकांची लायकी

'बिग बॉस'च्या घरात काल 'शेरास सव्वाशेर' हा टास्क रंगला. या टास्कमध्ये एक ते दहा नंबर नुसार स्पर्धकांना उभं राहायचं होतं. पहिल्या पाच नंबरवर जे उभे असणार होते ते आठवड्यासाठी सुरक्षित असणार होते. यामुळे पहिल्या पाच नंबरसाठी सपर्धाकांमध्ये स्पर्धकांमध्ये चुरस रंगली होती. 

या टास्कमध्ये आपण ज्या नंबरवर उभे राहिलो आहोत त्यासाठी आपली योग्यता सदस्यांना सिद्ध करायची होती. बिचुकले ४ तर रुपाली ७ नंबरवर उभी होती. जेव्हा रुपालीवर बोलण्याची वेळ आली तेव्हा तिने बिचुकले हे ४ नंबरवर उभं राहण्यास योग्य नाही हे सांगितले. हे बोलताना तिने बिचुकलेंवर आरोप करून तब्बल २० मिनिटं तिने मुद्देसूद आपली बाजू मांडत  बिचुकलेंची बोलती बंद केली. 

ही बाजू मांडताना एका क्षणी रुपालीने  बिचुकलेंना ''चार महिन्यांच्या मुलीची शपथ घ्या'' असं म्हणताच बिचुकलेंचा पार चढला. त्यांनी रुपालीला अत्यंत वाईट शब्दात सुनावलं आणि आपला नंबर सोडून ते बाहेर आले. एवढ्यात रुपालीने त्यांचा नंबर पटकावला आणि ती ४ नंबरवर जाऊन उभी राहिली. 

 

बिचुकलेंचा राग मात्र शांत झाला नव्हता. त्यांनी रुपालीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि तिच्या व्ययक्तिक आयुष्यावर ताशेरे ओढले. रुपाली मात्र या सर्व प्रकरणात शांत होती. त्यानंतर हीना पांचाळ आणि वैशालीने बिचुकलेंना समजावलं. आणि पुढे नंबर सोडल्याने बिचुकलेंना थेट दहाव्या नंबरवर उभं राहावं लागलं. 

आता शिवीगाळ केल्यामुळे बिग बॉस बिचुकलेंवर कारवाई करणार का? तसेच वीकएंडच्या डावात महेश मांजरेकर बिचुकलेंची कशी खरडपट्टी काढणार, हा कुतूहलाचा विषय आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive