By  
on  

बिग बॉस मराठी 2: किशोरीताईंनी सांगितली एक अशी आठवण की सदस्यांच्या डोळ्यात आले पाणी

'बिग बॉस'चे घर हे थोर कथांचा खजिना आहे. घरातील स्‍पर्धक एकमेकांसोबत किंवा कॅमे-यासमोर प्रांजळपणे त्‍यांच्‍या आयुष्यातील कथा शेअर करतात.

 बिग बॉसमधील अशाच एका निवांत क्षणी किशोरी शहाणे, विद्याधर जोशी ऊर्फ बाप्‍पा आणि सुरेखा पुणेकर यांना तिचा सर्वात भावनिक परफॉर्मन्‍स सांगताना दिसत आहे.

किेशोरी म्‍हणाली, ''माझे बाबा ज्‍यादिवशी गेले त्‍यादिवशी माझा एका अवॉर्ड फंक्‍शनमध्‍ये परफॉर्मन्‍स होता. मला आठवतंय  ते आयसीयूमध्‍ये होते लास्‍ट स्‍टेजवर, मी त्‍यांना सांगितलं की मी तुमच्‍याबरोबर राहणार पण ते मला म्‍हणाले की 'द शो मस्‍ट गो ऑन!' तू जायचं आणि परफॉर्म करायचं. मी त्‍यांचं ऐकलं आणि ज्‍यादिवशी माझे बाबा गेले त्‍यादिवशी मी परफॉर्म केलं!'' 

बाप्‍पा व सुरेखा ताई हे ऐकून थक्‍क झाले आणि त्‍यांना या धीट मनाचा अभिमान देखील वाटला. किशोरी पुढे म्‍हणाली, ''सगळ्यांना वाटलं होतं माझा तो परफॉर्मन्‍स कॅन्‍सल होईल पण मी परफॉर्म केलं माझ्या बाबांच्‍या बोलण्‍यावर. सचिन पिळगावकर यांना अवॉर्ड भेटलेला त्‍याच दिवशी, त्‍यांनी स्‍टेजवर मला ट्रिब्‍यूट दिला की सिन्‍सॅरिटी आणि अॅज अॅन अॅक्‍टर शो मस्‍ट गो ऑन काय असतं याची मिसाल किशोरी शहाणे आहे! त्‍यांना माझा हा ट्रिब्‍यूट की त्‍यांचे बाबा गेले तरी त्‍यांनी परफॉर्म केलं आणि महेश मांजरेकर यांनी पन सॅल्‍यूट केलं. २ वर्ष झाले बाबा जाऊन आता बट आय स्टिल रिमेम्‍बर दॅट डे.'' 

खरंच, हे धीटपणाचे व समर्पिततेचे उत्‍तम उदाहरण आहे. बिग बॉसच्या घरातील अशा कधीही न पाहिलेल्या गोष्टी तुम्हाला VOOT ऍप वर पाहायला मिळतील. 

Recommended

PeepingMoon Exclusive