बिग बॉस मराठी 2 : घरातल्या धोबीपछाड कार्यात कोणाचा होणार गेम, कोण होणार सेफ

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक डाव धोबीपछाड हे साप्ताहिक कार्य रंगत आहे... टास्क दरम्यान सदस्यांमध्ये बरीच भांडण, वाद विवाद, तू तू मै मै सुरु आहे... पण याचबरोबर सदस्य बरीच धम्माल मस्ती करताना दिसणार आहेत... टास्क व्यतिरिक्त देखील घरातील सदस्य बरीच मस्ती करतात...शिव, किशोरी आणि अभिजीत केळकर डान्स करता करता कपडे वाळविणे सुरु आहे. या टास्क मध्ये कोणाची टीम जिंकणार, कोण विजयी ठरणार हे बघणे रंजक असणार आहे.

 

 घरामध्ये रंगणार एक डाव धोबीपछाड हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे... टीम A आणि टीम B अशा टीम करण्यात आल्या आहेत... ज्यामध्ये नेहा टीम A ची आणि विद्याधर टीम B ची मॅनेजर असणार आहेत. वैशाली म्हाडे संचालक असणार आहे. या आठवड्यामध्ये विणा जगताप, विद्याधर जोशी, सुरेखा पुणेकर, अभिजीत बिचुकले आणि पराग कान्हेरे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले तर शिवला घरातील सदस्यांनी नॉमिनेट केल्याने तो देखील थेट नॉमिनेट आहे. तर हीनाचा घरातील पहिला आठवडा आणि वैशाली घराची कॅप्टन असल्याने त्या या आठवड्यात सेफ आहेत.... कोण घराबाहेर जाईल ? कोणाला प्रेक्षकांची मते मिळणार ? हे कळेलच...

Recommended

Loading...
Share