By  
on  

बिग बॉस मराठी 2: बिचुकलेंविरोधात भाजपच्या माजी नगरसेविकेचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

बिग बाॅस मराठीच्या घरात काही दिवसांपुर्वी 'शेरास सव्वाशेर' हा टास्क रंगला. या टास्क दरम्यान बिचुकले आणि रुपाली भोसले यांच्यात कडाक्याचं भांडणं झालं. 

यावेळी बिचुकलेंनी रुपालीच्या खाजगी आयुष्याबाबत उल्लेख करुन तिला अर्वाच्च्य शब्दात शिवीगाळ केली. याचसंबंधी भाजपच्या माजी नगरसेविका रितु तावडे यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन देऊन 'बिचुकलेंना घराबाहेर काढा' अशी मागणी केली 

 

बिचुकलेंनी रुपालीच्या घटस्फोटाचा उल्लेख करत तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. यामुळे एकल पालक आणि घटस्फोटित महिला यांचा घोर अपमान झाल्याचं म्हणणं रितू तावडे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलं. 

'शेरास सव्वाशेर' टास्कदरम्यान नंबरवरून झालेल्या वादात रुपाली आणि बिचुकलेंमध्ये जोरात वाद झाला. त्यावेळेस बिचुकलेंचा संयम ढळून त्यांनी रुपालीला वाईट शब्दात अपशब्द वापरले. घरातल्या सर्वांनी बिचुकलेंना शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु बिचुकले मात्र संपूर्ण घरभर फिरून रुपालीला शिवीगाळ करत होते. 

आता या तक्रारीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात का? आणि बिचुकलेंना बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागतं का, हे लवकरच कळून येईल. 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive