By  
on  

बिग बॉस मराठी 2: बिचुकलेंना आहे अभिनयाची सुद्धा आवड, जाणून घ्या

'बिग बॉस' घरामध्‍ये हिना पांचाळचा प्रवेश झाल्‍यानंतर अभिजीत बिचुकले व हिना पांचाळ आयकॉनिक बॉलिवुड सीन्‍सचे अनुकरण करताना आणि मनमोकळेपणाने नृत्‍य करताना सतत दिसत असतात.  हिना, माधव बिचुकलेला अभिनयाचे धडे शिकवताना दिसत आहेत. 

या तिघांमध्ये गप्पांना सुरूवात होते आणि माधव बिचुकलेला विचारतो, ''काय झालं त्‍या एन्‍ट्रान्‍सच्‍या इथल्‍या डायलॉगचं जो तुम्‍हाला शिकवलेला? चला रिहर्सल्‍स करू त्‍याची आता आणि हिला करून दाखवू.'' तो त्‍याला कसे उभे राहावे आणि संवाद बोलावे याबाबत मार्गदर्शन करतो आणि म्‍हणतो, ''दोरीच्‍या जागेवर हा माइक समजा म्‍हणजे आवाज येईल आणि डायलॉग पण मस्‍त जाईल.'' बिचुकले सीन करण्‍यासाठी उत्‍सुक होतो, पण खूर्चीवरच बसून सीन करायचा आग्रह करतो. माधव कडक 'दिग्‍दर्शका' प्रमाणे वागत बिचुकलेला प्रवेशद्वाराजवळ उभे राहून सीनचा सराव करण्‍यास सांगतो.  

यादरम्‍यान हिना बिचुकलेच्‍या प्रयत्‍नांचा आनंद घेताना दिसते. फक्‍त तीन प्रयत्‍नांनंतर दिग्‍दर्शक माधव बिचुकलेची प्रशंसा करत म्‍हणतो, ''क्‍या बात है! चला आता टेक करूया बसं डायलॉग थोडं स्‍लो बोला इन्‍टेन्सिटी राहिली पाहिजे, ओके. अॅक्‍शन!'' 

बिचुकले म्‍हणतो, ''तुम सब लोग मेरा वहां पर इंतजार कर रहे हो और मैं यहां तुम सब का इंतेजार कर रहा हूँ, ताकी तुम सब लोगो को एक एक कर मैं बाहर भेज सकू!'' उत्‍तम सीन दिल्या बद्दल हिना आणि माधव बिचुकले ची टाळ्या वाजवून प्रशंसा करतात व माधव म्हणतो, ''माइण्‍ड-ब्‍लोइंग बिचुकले! ह्याच्‍यापेक्षा बेटर होऊचं शकत नाही, अभिजीत बिचुकले जबरदस्‍त आहे!''  

एकूणच कवी मनाच्या या नेत्यांना अभिनयाची सुद्धा आवड आहे हे दिसून येते. बिग बॉसच्या घरातील अशाच न पाहिलेल्या गोष्टी प्रेक्षकांना Voot ऍपवर पाहायला मिळतील. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive