By  
on  

बिग बॉस मराठी 2: किशोरी ताईंनी मुलाच्या जन्मावेळचा हा किस्सा केला सदस्यांसोबत शेअर

बिग बॉस सीझन २ सुरू होऊन आता जवळपास एक महिना होत आला आणि स्पर्धक आता हळूहळू मोकळे होत आयुष्यातील एकेक गुपितं, आजवर जपून ठेवलेल्या आठवणी बाहेर काढू लागलेत. विविध टास्कचा ताण आणि नॉमिनेशनची भीती यातूनही वूटच्या 'अनसीन अनदेखा'वर आम्ही तुमच्यासाठी काही खास क्षण आणले आहेत. यात किशोरी शहाणे आणि हिना मातृत्वाबद्दल बोलताहेत.

उत्साही किशोरी यांनी आयुष्यात घडलेला एक प्रसंग हिना यांना सांगितला. हा एक सुंदर योगायोग होता. त्या आणि त्यांच्या दोन बहिणी एकाच वेळी गरोदर राहिल्या. किशोरी म्हणाल्या, "तेव्हा कुठे एवढं फोटो शूट न ऑल होतं. ती सेल्फी किंवा फोटो असता आमचा तर खूप मज्जा आली असती, प्रेग्‍नंट पोट घेऊन पिक्चर्स!" त्या पुढे म्हणाल्या, "माझा आणि माझ्या बहिणींचा बाळांपण माहेरीच झाला. माझ्या आईचा घर मॅटर्निटी वॉर्ड झालेला आमच्या तिघींची मुलं जन्मल्या नंतर, त्यामुळे हे जे कझिन्स आहेत ना, माझा मुलगा, मोठ्या बहिणीचा मुलगा आणि धाकट्या बहिणीची मुलगी तिघांमध्ये १५-२० दिवसांचा गॅप आहे!" किशोरीची ही गोष्ट ऐकून हिना अगदी आश्चर्यचकितच झाली.

तुमच्या आवडत्या स्पर्धकांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पाहत रहा वूटचे अनसीन अनदेखा!

Recommended

PeepingMoon Exclusive