By  
on  

बिग बॉस मराठी २: रुपाली आणि वैशालीमध्ये रंगला वादविवाद, पण नक्की कशावरुन ?

मराठी बिग बॉसला आता चांगलीच रंगत आली आहे. घरातील सदस्यांचा गुडी गुडी मुखवटा निघून त्याजागी खरे चेहरे दिसू लागले आहेत. बिग बॉसच्या घराला भांडणं, वादविवाद नवीन नाहीत. अनेकदा सदस्यांमध्ये दिलखुलास गप्पा रंगतात तर दुस-याच क्षणी वादविवादाला सुरुवात होते. सध्या घरामध्येही रुपाली आणि वैशालीमध्ये असाच वाद-विवाद रंगला आहे. यामध्ये वैशालीच्या पाठीमागून बोलण्याच्या सवयीवर रूपालीने तिची चांगलीच शाळा घेतली.

 

याला कारण होतं की एकदा वैशालीने शिळं अन्न खाल्ल्यावर होणा-या त्रासचं कारण देऊन तिने खाण्यास नकार दिला होता. पण नेहाने शिळा शिरा खायचं का विचारल्यावर इतरांनी नाही सांगूनही वैशालीने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे वैशालीची ही सवय चुकीची आहे हे रुपालीने पटवून दिलं. आता वैशाली हे मान्य करते का ते शोमध्ये कळेलच

Recommended

PeepingMoon Exclusive