By  
on  

बिग बॉस मराठी 2: लोकप्रियतेत बिचुकले अव्वल! या दोन सेलीब्रिटींना टाकले मागे

कवी मनाचे नेते म्हणत अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात दाखल झाले. आणि बघता बघता वेगळ्या व्यक्तिमत्वामुळे आणि अनोख्या शैलीमुळे बिचुकले बिग बॉसच्या घरात आणि प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले. 

वेगवेगळ्या 'स्ट्रॅटेजी' लढवत, कधी कोणाशी प्रेमाशी बोलत तर कोणाशी टोकाचे वाद करत बिचुकले घरात नेहमी चर्चेत राहिले. गेल्या काही दिवसांपूर्वी बिचुकलेंना सातारा पोलिसांनी चेक बाउन्स प्रकरणात बिचुकलेंना अटक केली. त्यामुळे सध्या बिचुकले या आरोपाखाली तुरुंगात आहेत. 

 

बिचुकलेंना अटक झाली असली तरी बिचुकलेंची लोकप्रियता मात्र वाढत चालली आहे. बिचुकलेंना अटक झाल्यापासून अभिजीत बिचुकले हे नाव गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलं. या सर्चच्या यादीत बिचुकलेंनी बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालक आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि नुकतेच खासदार झालेले अभिनेते अमोल कोल्हे यांनाही मागे टाकले आहे. बिचुकलेंना मिळालेल्या या प्रसिद्धीमुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. 

बिचुकले यांच्या जामिनाच्या अर्जावर उद्या सातारा न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यानंतर बिचुकलेंची या प्रकरणातून सुटका होणार का? आणि बिग बॉसच्या घरात परतणार का? या प्रश्नांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive