By  
on  

बिग बॉस मराठी 2: बिग बॉसच्या घरामध्ये ‘दोघात आला आहे तिसरा’, वाचा नक्की कुणाबाबत घडलं आहे हे

बिग बॉसच्या घरात भांडणं, रुसवे फुगवे हे नवीन नाहीत. पण अनेकदा घरातील रुक्ष वातावरणात मैत्रीला रोमान्सचे धुमारे कधी फुटू लागतात ते समजतही नाही. बिग बॉसच्या घरात एक मैत्री अशीच रोमान्समध्ये बदलता बदलता थांबली आहे. हे दोन मित्र आहेत शिव आणि वीणा. शिव आणि वीणाची गोड मैत्री प्रेक्षकांनाही आवडत होती. त्यांची भांडणं, रुसवे, फुगवे, एकमेकांना मनवणं हे प्रत्येकाला आवडत होतं. पण मंगळवारपासून मात्र दोघंही एकमेकांशी बोलत नाहीयेत.

 

यामध्ये कळीचा नारद आहे हीना. घरात नव्याने आलेल्या हीनाने इंफ्लुएंसरची भूमिका साकारायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच की काय हीनाची शिवसोबत होत असलेली जवळीक पाहून वीणाने त्याला जाब विचारला. यावर शिवनेही हिशोब पाप-पुण्याचा या नॉमिनेशन टास्कमध्ये वीणा ऐवजी हीनाला सुरक्षित केलं. त्यामुळे या दोघांमध्येही आता फुट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. शिव वीणाचा हा अबोला कधी सुटेल याची वाट त्याचे फॅन्स पहात आहेत.  

Recommended

PeepingMoon Exclusive