By  
on  

बिग बॉस मराठी 2: हीना पांचाळ या अभिनेत्रीला मानते आदर्श

बॉलिवुडची राणी दिपिका पदुकोणने तिच्‍या उत्‍तम अभिनयासह अनेकांची मने जिंकली आहेत. सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक असलेली ही अभिनेत्री अनेकांसाठी एक प्रेरणास्रोत आहे आणि ती अत्‍यंत मोहक आहे. तिचे चाहते तिच्‍या आकंठ प्रेमात आहेतच. आता आम्‍हाला ही अभिनेत्री 'बिग बॉस' घरामधील कोणाचीतरी आदर्श असल्‍याचे समजले. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा' च्‍या नवीन क्लिपमध्‍ये वाइल्‍ड कार्ड प्रवेशक हिना पांचाळ दिपिका पदुकोणसोबत तिच्‍या पहिल्‍या भेटीबाबत सांगताना दिसत आहे. 

अभिजीत केळकरसोबत गप्‍पागोष्‍टी करत असताना हिना संजय लीला भन्‍साळीच्‍या दिग्‍दर्शनाची प्रशंसा करते आणि सुपरहिट चित्रपट 'रामलीला' मधील गाणे 'नगाडा संग ढोल बाजे' साठी शूटिंग करताना दिपिकासोबत काम करण्‍याच्‍या संस्‍मरणीय अनुभवाला उजाळा देते. ती म्‍हणाली, ''दिपिका २०० टक्‍के एफर्टस् देते आपल्‍या कामात. त्‍या साँगसाठी तिने एवढी प्रॅक्टिस केली आहे, एवढी नाचली आहे ती की तिच्‍या पायातून रक्‍त निघायला लागलेलं. ती प्रॅक्टिस करते, रिहर्सल्‍स करते त्‍यानंतरच टेकमध्‍ये जाते.'' ती पुढे म्‍हणाली, ''मला तिचे हे सगळे गुण घ्‍यायचे आहेत, तिच्‍या सारखंच डेडिकेटेट आणि हार्डवर्किंग व्‍हायचं आहे. तिच्‍यात जरासा सुद्धा अॅटिट्यूड नाही आहे.'' खरंच, हिना आम्‍हाला तुझा निर्धार आवडला!

'बिग बॉस'मधील असे मसालेदार किस्‍से जाणण्‍यासाठी पाहा 'अनसीन अनदेखा' फक्‍त वूटवर!

Recommended

PeepingMoon Exclusive