By  
on  

बिग बॉस मराठी 2: सदस्यांच्या प्रयत्नांमध्ये पराग टिकणार का सिंहासनावर?

'बिग बॉस मराठी 2' मध्ये सध्या 'टिकेल तोच टिकेल' हे नॉमिनेशन कार्य सध्या सुरु आहे. या कार्यामध्ये घरातील सदस्य दोन टीममध्ये विभागण्यात आले आहेत. 

या कार्यात एका टीममधील सदस्याला गार्डन एरियात ठेवलेल्या सिंहासनावर जाऊन हातात राजमुद्रा घेऊन बसायचे आहे. त्याचवेळी दुसऱ्या टीममधील सदस्याला सिंहासनावर बसलेल्या सदस्याला हरतऱ्हेचे प्रयत्न करून त्याला सिंहासनावरून खाली उतरवायचे आहे. 

 

या टास्कमध्ये पराग सिंहासनावर बसला होता. तेव्हा त्याला सिंहासनावरून उठवण्यासाठी विरोधी टीममधील अभिजीत केळकर, नेहा शितोळे, हीना पांचाळ आदी सदस्यांनी परागच्या अंगावर क्रीम तसेच रंग लावून परागला सिंहासनावरून खाली खेचायचा प्रयत्न केला. 

याचवेळी अभिजीत केळकर परागचे पाय खेचून त्याला खाली ओढायचा प्रयत्न करताच पराग चिडला. त्याने संचालिका यांना मोठ्या आवाजात टास्कमध्ये लक्ष देण्यास सांगितले. आता या टास्कमध्ये अजून कोणती रंगत पाहायला मिळणार हे आजच्या भागात कळून येईल. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive