By  
on  

बिग बॉस मराठी 2: अखेर परागने दिली रूपालीप्रती प्रेमाची कबुली

'बिग बॉस'च्या घरामध्‍ये प्रेमाचा अंकुर बहरला आहे. आम्‍ही पराग आणि रूपालीबाबतच बोलत आहोत. अगदी प्रांजळपणे आपल्‍या भावना व्‍यक्‍त करताना दिसत आहे.

 ''रूपालीच्‍या तरूण मित्रांनो, तिच्‍या फॉलोअर्स, फॅन्‍स आणि तिच्‍या मागे लागलेल्‍या सगळ्या तरूणांना मला एक संदेश द्यायचा आहे – प्रयत्‍न चालू ठेवा, बट शी इज माइन, शी इन ओन्‍ली माइन!'' असे प्रेममय भावनेने पराग म्‍हणतो. याला रूपाली अगदी प्रसन्‍नपणे उत्‍तर देत म्‍हणते, ''येस, बट अॅज ए वेरी गुड फ्रेण्‍ड!''  

पण पराग त्‍याचे नशीब आजमावणे सुरूच ठेवतो. रूपाली आपल्‍या मतावर ठाम राहत म्‍हणते, ''पराग राव तुम्‍ही चुकताय! पण हा टकलू मित्र मला आवडतो, खूप आवडतो आणि हो मी थोडीशी पझेसिव्‍ह होते त्‍याच्‍या बाबतीत इन फॅक्‍ट तो ही होतो कारण आम्‍ही एकमेकांना खूप प्रेम करतो, आम्‍ही एकमेकांसाठी खूप प्रोटेक्टिव्‍ह आहोत आणि एकमेकांची काळजी करतो. खूप प्‍युअर प्रेम आहे हे.'' 

हे खरे प्रेम आहे की फक्‍त आणखी एक एकतर्फी प्रेम? हे प्रेक्षकांना बिग बॉसच्या पुढच्या काही भागात कळून येईल. बिग बॉसमधील अशाच काही गोष्टी प्रेक्षकांना VOOT ऍपवर पाहता येतील. 

Recommended

PeepingMoon Exclusive