By  
on  

बिग बाॅस मराठी 2: म्हणून पराग कान्हेरेवर बिग बाॅसची कठोर कारवाई, होणार घराबाहेर ?

'बिग बाॅस मराठी 2' अनेक कारणांनी चर्चेत आहे. शिवानीला बिग बाॅसने घराबाहेर जाण्याचा आदेश देणं, बिचुकलेंना झालेली अटक यामुळे हा सीझन रंगत आला आहे. आता या घरात आणखी एका स्पर्धकाला खुद्द बिग बॉसनेच बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 

या सीझन मध्ये 'टिकेल तोच टिकेल' हा टास्क सुरु आहे. या टास्कदरम्यान पराग कान्हेरेने रागाच्या भरात घरातील नेहा आणि वैशाली या महिला सदस्यांना धक्काबुक्की केली. तर राग अनावर झाल्याने नेहाच्या चक्क श्रीमुखात भडाकावली.  यामुळे बिग बाॅसने परागवर कठोर कारवाई करत त्याला घराबाहेर जाण्याचा आदेश दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पराग आता घराबाहेर गेल्याच्या जबरदस्त चर्चा रंगल्या आहेत. 

परागला सिंहासनावरून खाली खेचण्यासाठी वैशाली आणि नेहा ,अभिजीत जोर लावतात. पराग नेहाच्या अंगावर पडतो. 

बिग बाॅसच्या घरात कुठल्याही प्रकारच्या हिंसेला प्रोत्साहन वा समर्थन दिलं जात नाही. यामुळे परागने घरातील महिलांशी केलेल्या दुर्व्यवहारामुळे बिग बाॅसने परागला घराबाहेर जाण्याची शिक्षा दिली आहे. 

परागवर झालेल्या अशा अनपेक्षित कारवाईमुळे घरातील सर्वांना धक्का बसला आहे. त्यामुळे बिग बाॅसच्या घरात आणखी कोणत्या नाट्यमय घटना पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive